photo 
छत्रपती संभाजीनगर

लॉकडाऊनमध्ये फेसबुकवर बहरली प्रेमकहाणी अन्... 

अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : महाविद्यालयाच्या काळात प्रेम बहरले... मनातल्या भावनांना शब्दरूप देण्याचा संकल्प केला... पण असे प्रेमपुस्तक लिहिण्याचा हा संकल्प पुढे व्यवसायाच्या धामधुमीत राहूनच गेला. मनाला रूखरूख लागून राहिली. मात्र, ही संधी सध्याच्या लॉकडाऊनने उपलब्ध करुन दिली. मयूर सोनवणे या तरुणाने अवघ्या २१ दिवसात ‘प्रेमाचा पिझ्झा’ ही प्रेम कहाणी लिहून काढलीय. सध्या फेसबुकवर ही कहाणी चांगलीच बहरत आहे. मयूर या कहाणीचा दररोज एक-एक भाग पूर्ण करुन फेसबुकवर टाकत गेला. या कहाणीने तरुणाईला अक्षरश: भुरळ घातलीय. त्याच्या दररोजच्या भागाला पन्नास हजारांच्या जवळपास व्ह्यूज मिळत आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

लॉकडाऊनच्या काळात लोकांना काय करावे असा प्रश्न सतावत आहे. सध्या मिळालेला वेळ आयुष्यात केव्हाच मिळू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. नेमकी हीच परिस्थिती मयूरने हेरली आणि त्याचा पुरेपूर उपयोग करुन घेतला. कॉलेज जीवनात पुस्तक लिहिण्याचे अधुरे राहिलेले स्वप्न लॉकडाऊनमध्ये पूर्ण केले. या प्रेम कहाणीने फेसबुकवरील तरुणाईला बेधुंद केलेय. कदाचित पुस्तक प्रकाशन करून इतका वाचक मिळाला असता का याबद्दल साशंकता आहे. असे असले तरी ही सोशल मीडीयाने भरभरून वाचक दिल्याने आपण धन्य झालो, वेळेचा सदुउपयोग झाला, अशी प्रतिक्रिया मयूर सोनवणे यांनी व्यक्त केली आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मयूर पुढे म्हणाला, की देशभरात २१ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला, आता काय करावे हा यक्ष प्रश्न समोर उभा राहिला. कामात व व्यवसायात एवढे गुंतलेलो असतो की स्वतः साठी असा वेळच मिळत नाही. जर ठरवले तरी ते जमलेच असेही नाही. पहिले दोन दिवस कसेतरी घालवले, पण नंतर घर आवरताना २००८ साली मी एक छोटीशी लव स्टोरी ‘प्रेमाचा पिझ्झा’ लिहायला घेतली होती. ती शिक्षण व नंतर जॉब, पुढे व्यवसायात उतरल्याने पुस्तक प्रदर्शित करण्याची संधी नाही मिळाली. तीच कहाणी मी या लॉकडाऊन काळात लिहून पूर्ण केली. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

प्रेरणादायी कमेंटमुळे भारावलो 

मयूरला पुस्तक प्रकाशीत करायचे होते, पण ते कसे असा प्रश्न असतानाच फेसबुकची कल्पना समोर आली. ३१ मार्चला मयूर सोनवणे या नावाने त्याने पेज बनवले. दररोज एक भाग फेसबुक पेजवर टाकला. मी या कहाणीचा सातवा भाग पोस्ट केला. कहाणीचे एकूण आठ भाग आहेत. या कहाणीला ४५ हजाराहुन अधिक व्ह्युज आणि २० हजार हुन अधिक लाईक्स मिळाले आहेत. वाचकांच्या प्रेरणादायी कमेंटमुळे भारावुन गेलो आहे, असे तो सांगतो.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाईट, कॅमेरा, अ‍ॅक्शन..! Rohit Sharma लवकरच Netflix च्या चित्रपटात झळकणार? माजी कर्णधारने दिले संकेत...

Khed Karanjavihire road safety: खेंगलेवस्ती परिसरात उघडी विहीर, वाढत्या वाहतुकीत दुर्घटनेचा धोका; प्रशासन व जागा मालक सुस्त

मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे?

Bhandup Hospital MNS Protest : मुंबईत 19 वर्षीय तरुणीवर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याकडून जबरदस्ती, मनसेचा आरोप, कर्मचाऱ्याला मारहाण

Baramati by-election News: बारामती पोटनिवडणूक : कॉंग्रेसची अखेर माघार, आकाश मोरे यांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतला

SCROLL FOR NEXT